समाजसेवक गणेश अंकुशराव यांच्या संकल्पनेतुन साजरा झाला अनोखा वाढदिवस
पंढरपुर (प्रतिनिधी) : पंढरपुरच्या तहसिलदारांचा वाढदिवस नुकताच सर्वत्र साजरा झाला, तसा तो चंद्रभागेच्या वाळवंटातही साजरा झाला, परंतु इथ साजरा झालेला वाढदिवस हा अनोखा ठरला तो यामुळे की, येथे चंद्रभागेच्या वाळवंटात अवैध वाळु उपशामुळे पडलेल्या खड्डड्यांमध्ये केक कापुन टाळ्या वाजवत तहसिलदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला. पंढरपुरातील विविध समस्यांवर आवाज उठवणारी सामाजिक संघटना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या संकल्पनेतुन हा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी तहसिलदार यांना वाढदिवसानिमित्त उदंड अयुष्य लाभो अशी प्रार्थना भक्त पुंडलिक व श्रीविठ्ठल रुक्मिणीमातेच्या चरणी करण्यात आली. आणि यावेळी अवैधरित्या बेसुमार वाळु उपसा करणारांचा व त्यांना पाठीशी घालणार्या प्रशासनाचाही जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
शासनाने अवैधरित्या वाळु उपसा रोखण्यासाठी ‘मागेल त्याला वाळु’ हा उपक्रम राबवला जातोय परंतु पंढरपुर तालुक्यात या योजनेचा पुरता बोजवारा उडालेला असुन अवैधरित्या वाळु उपसा करणारे वाळु माफिया राजरोसपणे चंद्रभागेच्या पात्रातुन बेसुमार वाळु उपसा करत असल्याचे दिसून येत आहे. याचाच निषेध म्हणुन हा वाळु उपसा रोखण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत, तहसिलदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रभागेत अवैध वाळु उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात केक कापला. अशी माहिती यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिली.
यावेळी सतीश नेहतराव, रमेशनेहतराव, महेश संगीतराव, उत्तम परचंडे, राजु कोळी, सुरज कांबळे, सोमनाथ खेडेकर, गणेश परचंडे, धोंडीराम नेहतराव, विठ्ठल करकमकर, राजु बळवंतराव, लाल्या अधटराव, संपत सर्जे, रामभाऊ कोळी, सोपान अंकुशराव, प्रदीप सुरवसे, नवनाथ परचंडे, ओंकार परचंडे, भैया साळुंखे, गणेश अभंगराव व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments