पंढरपूर(प्रतिनिधी)
लहान वयातच व्यावहारिक ज्ञान यावं, यासाठी शाळेत बाजार भरवला जातोय असाच आदर्श बाल व प्राथमीक मंदीर शाळेमध्ये बाजार भरवण्यात आला. चिमुकल्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील व्यवहाराचे ज्ञान मिळावं, या उद्देशाने चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये भाजी बाजार भरवण्यात आला. या बाजारात चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताही अनुभव मिळालेला नसतो. बाजार आणि मुले यांचा संबंध दूरच, परंतु हाच अनुभव शाळेमध्ये मुलांना प्रत्यक्ष बाजार भरवुन मिळाला. मुलांना बाजारातून होणारी भाजीपाल्याची, फळांची, किराणा मालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.यावेळी मुला-मुलींनी विविध प्रकारचा भाजीपाला, फळे, चहा स्टॉल,पाणी पुरी,पाव भाजी,वडा पाव, किराणा स्टॉल हॉटेल स्टॉल आदी दुकाने शाळेच्या आवारात थाटली होती. बाजारातील गर्दीचाही अनुभव घेतला.बाजार शाळेतच आल्याने विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. बाजार भरविण्यासाठी शाळेतील शिक्षीका रजनी देशपांडे,आशा पाटील,सुवर्णा सपकाळ मार्गदर्शन केले.समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांनी शाळेमधील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.हा बाजार भरवल्यामुळे विद्यार्थ्याना व्यवहारात ज्ञान माहीत होणे,नफा तोटा व खरेदी विक्री ची माहित होईल.


0 Comments