आमची लेखणी, दिग्दर्शकाची दृष्टी आणि एक दमदार आवाज आज शांत झाला...!
पंढरपूर प्रतिनिधी -
खूपच धक्कादायक. दि पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित कवठेकर हायस्कूल येथे सेवेत असणारे नंदकुमार कुलकर्णी सर यांचे निधन झाले त्यांच्यावर प्रेम करणारा असंख्य मोठा विद्यार्थी गण आहे त्यांच्या जाण्याने कवठेकर हायस्कूल सह असंख्य विद्यार्थ्यांना दुःखाचा डोंगर कोसळला असल्यास वाटत आहे आज अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली. नंदकुमार उर्फ एन एन कुलकर्णी.. सारखे जिवलग गुरु मिळण असंभव आहे. सदैव विद्यार्थ्यांसाठी, कलाकारांसाठी आणि गरजू लोकांसाठी, झिजणाऱ्या या निरागस व्यक्तिमत्वाला आम्ही मुकलो आहोत. आम्ही पोरके झालो आहोत. N N सरांसारखा गुरु, होणे नाही. त्यांची अंतयात्रा १०.०० वाजता निघणार आहे.


0 Comments