पंढरपूर तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग येथे आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष पैलवान अनिल अभंगराव भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पैलवान संदीपजी माने राष्ट्रवादी युवक काॕग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे युवा उद्योजक व समाजसेवक लखन माने हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीस प्रशासनाचेवतीने प्रसाद सोनवले सर यांनी आलेल्या सर्व समाज बांधवांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले व महर्षी वाल्मिकी जयंतीच्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष व महादेव कोळी समाज कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक सुनिल कोरे सर महादेव कोळी समाज कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुंडिबा कांबळे सर जिल्हा कार्याध्यक्ष आवेश करकमकर सर उपाध्यक्ष आण्णासाहेब रायजादे सरचिटणीस संतोष कांबळे सर शिवाजी जाधव सर जि.प.प्रा,शाळा शेगांव दुमालाचे मुख्याध्यापक शरद कोळी सर संभाजी माने सर मनमोहन अभंगराव उमेश अभंगराव सुनिल अधटराव ओझेवाडी केंद्रांचे केंद्रप्रमुख अनिल बंडगर साहेब तपकीरी शेटफळ केंद्राचे केंद्रप्रमुख क.ज्ञा.कुंभार साहेब ओझेवाडी शाळेचे मुख्याध्यापक भारत शिंदे शहाजी देशमुख सर गोरे मामा देवानंद चव्हाण सर रोहित करकमकर औदूंबर अभंगराव आदी समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक काॕग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदिपजी माने बरमदे सर शहाजी देशमुख सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सुनिल कोरे सर यांनी केले तर आभार गुंडिबा कांबळे सर यांनी मानले.


0 Comments