शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ), युवासेना व आढीव ग्रामस्थांच्या वतीने आढीव ता.पंढरपूर येथे दूध दरवाढ विरोधात सरकारच्या विरोधात रास्ता रोखो करण्यात आला.
या निष्क्रीय सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या दूध दर वाढी साठी आढीव येथील पंढरपूर - कुर्डवाडी हायवेवर रस्ता रोखो करून आंदोलन करण्यात आले,
यावेळी रणजित बागल, शिवसेना उपतालुकाप्रमुख इंद्रजीत गोरे, पंढरपूर उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, रोपळे विभाग प्रमुख नागनाथ रितुंड, युवासेना उपतालुकाप्रमुख समाधान गोरे, युवासेना उपतालुकाप्रमुख प्रणित पवार, रोपळे शाखा प्रमुख नामदेव चव्हाण, विलास गणगे तसेच आढीव या गावातील वरीष्ठ शंकर महाराज चव्हाण, दिनकर दाजी चव्हाण, चंद्रकांत महाडिक, दत्तात्रय गोरे, विलास कांबळे, औदुंबर चव्हाण, गणेश जाधव, आबासो चव्हाण, रमेश चव्हाण, द्रोणाचार्य चव्हाण, नवनाथ वाघ, सोमनाथ गोरे तसेच आढीव गावातील सर्व शेतकरी, युवक व मान्यवर यांच्या सहकार्याने आढीव येथे पंढरपूर - कुर्डवाडी हायवेवर दुधाला दर वाढ मिळण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, त्यावेळी शिवसेना, युवासेनेच्या वतीने पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक मा.टी.वाय.मुजावर साहेब याना लेखी निवेदन देण्यात आले.


0 Comments