LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अभिजीत पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनाला लोकांचा प्रतिसाद

प्रतिनिधी : 

पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानात २५ डिसेंबर पासून भव्य श्री शिव महापुराण कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिहोंर येथील सुप्रसिद्ध पंडित श्री.प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्या ओघवत्या वाणीतून ही कथा ऐकण्यासाठी केवळ पंढरपूर आणि महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्यांमधून भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती आहे..

"आपलं जीवन व्यर्थ वाया घालवण्यापेक्षा सकारात्मक कार्यात, इतरांच्या मदतीसाठी, सेवेसाठी समर्पित करा.. पांडुरंगाचं नाव घ्या.. यातच जीवनाचे सार्थकत्व आहे." हा पंडित श्री.प्रदीपजी मिश्रा महाराजांचा संदेश सर्वांसाठी डोळ्यात अंजन घालणारा ठरला..

"हरिहर भेट" हा सोहळा अत्यंत दुर्लभ असा असतो.. शिव महापुराण कथेच्या प्रसंगी आज हरी आणि हर शिव आणि विठ्ठल भेटीचा प्रसंग भाविकांना अनुभवता आला.. विठ्ठलाच्या आणि महादेवाच्या स्वरूपात अवतार धारण करत कथेच्या माध्यमातून प्रत्यक्ष हरिहर भेट पाहण्याची संधी मिळाली..

जसे जसे दिवस पुढे जात आहेत, तसे तसे भाविकांच्या संख्येत आणि कथा श्रवणाच्या उत्सुकतेत मोठी वाढ होताना दिसत आहे.

दैनंदिन प्रथेप्रमाणे रोज वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि आरतीने कथेला प्रारंभ होतो. माजी सैनिक, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, संत मंडळी, ज्येष्ठ नागरिक यांच्यानंतर आज सोहळ्यात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या हस्ते पूजन आणि आरती करण्यात आली..

आपल्या कार्यकुशलतेमुळे आणि कर्तुत्वामुळे पंढरपूर मधील नागरिकांच्या व तरुणाईच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटविणारे कथेचे यजमान श्री.अभिजीत पाटील हे देखील संपूर्ण कथा आयोजन, नियोजन समिती व सर्व व्यवस्थित नेहमीप्रमाणे अत्यंत सक्रियपणे सहभागी होत आहेत..

महापुराण कथा श्रवण करण्याचे भाग्य हे देवदुर्लभ असून उर्वरित दोन दिवसाची कथा श्रवण करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने यावे व या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन अभिजीत पाटील यांनी केले आहे..

Post a Comment

0 Comments