प्रदीपजी मिश्रा महाराज आपण स्वत: चंद्रभागेत स्नान करण्यासाठी यावं!
पंढरपुर (प्रतिनिधी) : सध्या पंढरपुरमध्ये प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा सुरु आहे. लाखोंच्या संख्येने भाविक भक्त त्यांचे प्रवचण ऐकण्यासाठी आलेले आहेत. दरम्यान प्रदीपजी मिश्रा महाराज यांनी पंढरपुरातील स्थानिक लोक चंद्रभागेत स्नान करत नाहीत, व विठ्ठलाला जात नाहीत, फक्त पैसे कमावतात. असे वक्तव्य केल्याबाबतची चर्चा सध्या पढरपुरात ऐकावयास मिळत असुन, महाराजांनी जर असे वक्तव्य केले असेल तर ते योग्य नाही, त्यांनी वस्तुस्थिती समजुन घ्यावी, सद्यस्थितीत चंद्रभागेच्या पात्राची अवस्था एवढी वाईट आहे की, येथे स्नान करणे केवळ अशक्य आहे, आम्ही प्रदीपजी मिश्रा महाराजांना चंद्रभागेत स्नानासाठी आमंत्रित करत आहोत की, त्यांनी स्वत: चंद्रभागेच्या पात्रात यावे आणि शहानिशा करावी. अशी प्रतिक्रिया पंढपुरमधील समाजसेवक तथा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्षगणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
पंढरपुरचे महात्म्य, चंद्रभागेचे महात्म्य आणि श्रीविठ्ठलाच्या भक्तीचे महत्व हजारो वर्षांपुर्वीच अनेक साधुसंतांनी वर्णन केलेले आहेे. अशा महान साधु संतांच्या साहित्यावरंच हल्लीचे अनेक महाराज मंडळी किर्तन, प्रवचन करत असतात. त्यामुळे पंढरपुरातील नागरिकांसह इथं येणार्या लाखो भाविक भक्तांना चंद्रभागेच्या स्नानाचे महत्व वेगळे सांगण्याची गरज नाही. हे जसे खरे आहे तसेच पंढरपुरातील अस्वच्छता, येथील असुविधा आणि पंढरपुरकरांना त्रस्त करुन सोडणार्या अनेक समस्या जैसे थे आहेत हे कटुसत्य आहे. कांही महाराज मंडळी पंढरपुरात येतात, इथं प्रवचनं वगैरे कार्यक्रम भर वस्तीत भरवतात, त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड असा वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो, महाराज मंडळी मात्र पैसे कमावतात. यावर मात्र कोणीही महाराज मंडळी अथवा नेता चक्कार शब्द बोलायला तयार नाही. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासुन चंद्रभागेतील होणारा वाळु उपसा, अस्वच्छता, महिलांसाठी प्रसाधन गृह, मुतारी, रस्ते, अशा विविध समस्यांबाबत अनेक आंदोलनं केली परंतु याचे कौतुक कोणी करत नाही, खरं तर चीड जेंव्हा अधिक येते जेंव्हा या प्रश्नांबाबत मुग गिळुन बसणारी कांही लोकंच सवकांर्ही निमुटपणे सहन करणार्या पंढरपुरकरांना नावं ठेवतात! अशी बोलकी प्रतिक्रियाही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
आता गणेश अंकुशराव यांचे आमंत्रण स्वीकारुन प्रदीपजी मिश्रा महाराज चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी येणार का? आणि येथील असुविधांबाबतही बोलणार का? हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


0 Comments