पंढरपूर प्रतिनिधी -
महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत शनिवार व रविवार या दिवशी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे देवाची पाद्यपूजा न करता भाविकांची गैरसोय होऊ नये असा निर्णय घेतला होता.
मात्र सध्या पंढरपुरात नियोजित कार्यक्रम महाशिवपुराण व नाताळाच्या सुट्ट्या असताना देखील रविवारी देवाची पाद्य पूजा करून भाविकांची गैरसोय केली आहे. यामध्ये मंदिर समितीकडून मोठ्या प्रमाणात अर्धकारण झाले असल्याचे समजते तर या पूजेमुळे दर्शन बारीमध्ये उभे असणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय झाली आहे. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भाविकांमधून होताना दिसत आहे वास्तविक पाहता सध्या पंढरपूर शहरात असणारी गर्दी व समितीकडून त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून घेतलेले निर्णय स्वतःच समितीतील अधिकारी व समिती सदस्यांकडून धाब्यावर बसवण्याचे काम सुरू आहे याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुळातच अनेक विषयात मंदिर समिती महाराष्ट्राच्या हिटलिस्टवर येत असतानाच आज पुन्हा एकदा असा प्रकार समोर आला आहे यामध्ये बराच वेळ श्री विठ्ठलाची दर्शन रांग थांबवण्यात आली होती त्यामुळे भाविकांमधून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.


0 Comments