पंढरपूर प्रतिनिधी -
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावर झालेल्या आरोप व तक्रारींवर बोलताना अभिजीत पाटील यांनी सदर कर्ज जुने आहे तर याबाबत माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी तक्रार केली असल्याचा खुलासा केला होता त्यावर आज भगीरथ भालके यांनी पत्रकार परिषद घेत ...विठ्ठल सह साखर कारखान्यांवर मागील दोन दिवसांपासून चेअरमन वरती जो गुन्हा दाखल करण्याबाबत प्रसिध्दी चालू आहे. यामध्ये निव्वळ नौटंकीपना आहे. हा वेगळाच डाव आहे. हे गौडबंगाल असून विद्यमान चेअरमन आणि शिखर बँकेंचे प्रशासक यांच्यात मिलीभगत आहे. कारखान्यावर लिलाव करून खाजगी करून घशात घालण्याचा चेअरमन अभिजीत पाटील यांचा डाव आहे. बँकेने दिलेले फसवणुकीचे पत्र हे आमच्या काळातील नसून मागील दोन गाळप हंगामातील न भरलेल्या पैशाबाबत आहे. परंतु विनाकारण आम्हाला बदनाम करण्यासाठी जुने कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. आशी माहिती माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.


0 Comments