दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी आयोध्या येथे राम मंदिरामध्ये श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यासाठी देशभर घरोघरी अक्षदा वितरणाचे कार्य चालू आहे. सुडके गल्ली, सांगोला रोड, संतपेठ, बागवान मोहल्ला या परिसरात या अक्षदा घरोघरी वितरित करण्यात आल्या. "या अक्षदा 22 तारखेला आपल्या घरातील देवघरात वाहून आपणही त्यावेळी आपल्या घरातूनच प्रभू रामाच्या पूजेचा अनुभव घ्यावा"... असे आव्हान भाजपा युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव यांनी सर्वांना केले. यावेळी आदम बागवान, प्रशांत( बाबा) धुमाळ, प्रणव नाझरकर, अमित गोसावी. अमर गायकवाड .सतीश सासवडकर. अविनाश जक्कल. ऋतुराज रोपाळकर. करण लकेरी. रोहन ओतारी. मयूर गोसावी. आदित्य भोसले. आकाश पोळ. सुहास वाघमारे. इस्माईल बागवान. इंद्रजीत वाघमारे
.... ....तसेच संतपेठ, बागवान मोहल्ला, सांगोला रोड येथील भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपचे असंख्य कार्यकर्ते व रामभक्त उपस्थित होते.


0 Comments