पंढरपूर येथील पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात संगीत कलेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तीला कै.पुष्पा कै.नारायण दुधाणे स्मृती संगीत सेवा सन्मान पुरस्कार यंदा पंढरपूर येथील गायक दिलीप टोमके यांना जाहीर झाल्याचे नादब्रह्म कला फाउंडेशन चे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले
हा पुरस्कार शनिवार दिनांक २ मार्च रोजी सायं ५:३० वा.आरती मंडप प्रांगण भक्ती मार्ग येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिला जाणार असून लगेच दोन सत्रात गायनाला सुरुवात होणार असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन नादब्रह्म कला फाउंडेशन व मनमाडकर परिवार यांचे वतीनं करण्यात येत आहे.
0 Comments