LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिरवळ पोलीसांचा रूट मार्च

 


 संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा) प्रतिनिधी. राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे चांगलेच वाहत आहे. तसेच येणाऱ्या आगामी सण उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिरवळ पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्यापासून ते बस स्थानक तसेच बाजारपेठ आणि परिसरांत रूट मार्च करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च काढण्यात आला. शिरवळ पोलीस ठाण्याचा मागील काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या बदलीनंतर शिरवळ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. यापूर्वी पोलीस निरीक्षक जगताप हे सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जो कोणी अवैध धंदा करीत असतील तर त्यांनी ताबडतोब बंद करावेत. तसेच नागरिकांना देखील अवैध धंद्याबाबत काही माहिती असल्यांस त्यांनी तात्काळ शिरवळ पोलीस ठाण्याच्या ०२१६९,२४४१३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. आणि लोकसभा निवडणुका तसेच आगामी धार्मिंक सण उत्सवांच्या काळात शिरवळ परिसरांत  शहरांतील आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी शांतता राखावी आणि आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे देखील आवाहन शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments