LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आवताडे यांनी मतदारसंघातील हुलजंती या गावी तसेच विविध ठिकाणी गाठीभेटी दिल्या

 

*लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. श्री राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आमदार श्री समाधान दादा आवताडे साहेब यांची पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात जनतेसमवेत तसेच पदाधिकारी वर्गासमवेत गाठीभेटी आणि घोंगडी बैठका*! 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने *सोलापूर लोकसभेचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आज आमदार श्री समाधान दादा आवताडे साहेब*  यांनी मतदारसंघातील हुलजंती या गावी तसेच विविध ठिकाणी गाठीभेटी दिल्या सोबतच घोंगडी बैठका घेत यावेळी नागरिकांशी विविध विषयांवरती संवाद साधला.

यादरम्यान *आमदार दादाश्री यांनी देशाचे यशस्वी आणि कर्तव्यदक्ष असे आपले पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा सशक्त, समृद्ध आणि विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी सोलापुरातून कमळला मोठया मताधिक्याने विजयी करून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचा निर्धार केला. तसेच आदरणीय मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी पाहण्यासाठी अहोरात्र काम करण्याचे आश्वासन ही जनतेने दादाश्रींना दिले

यावेळी उपस्थित मा. व्हा.चेअरमन श्री अंबादास कुलकर्णी तसेच मा.सरपंच श्री.विजय दादा माने तसेच हुलजंती येथील ग्रामस्थ पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments