LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

धुळे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई...

 स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षकांसह दोन हवालदार जाळ्यात अडकले, हद्दपार करत नाही नाही म्हणून केली होती लाचेची मागणी





संभाजी पुरीगोसावी (धुळे जिल्हा) प्रतिनिधी. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या पथकांने मोठी कारवाई केली असून. यामध्ये धुळे जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांसह दोन हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरुन तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी जवळपास दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. यामध्ये तडजोडी अंतिम निर्णयादरम्यान दीड लाख रुपये स्वीकारताना पोलीस हवालदार नितीन मोहने व अशोक पाटील यांना रंगत पकडले त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना देखील ताब्यांत घेण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यात पोलीस खात्यातीलच अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यामुळे धुळे धुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. तिघा आरोपीं विरोधांत दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी एसीबी नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील धुळे एसीबी रूपाली खांडवी पोलीस हवालदार राजन कदम पोलीस नाईक संतोष पावरा पोलीस शिपाई रामदास बारेला चालक पोलीस नाईक बंडगुजर यांच्या पथकांने केली आहे.

Post a Comment

0 Comments