अनुजा कारखेले मॅडम (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनात महिला आयोग आपल्या दारी, या उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारीबाबत जन सुनावणी घेण्यात आली, यावेळी आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि अनेक कडक कायदे असुनही त्यांच्यावरील अन्याय अत्याचारांच्या घटना वाढत आहेत, या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येवुन तक्रार करावी तक्रारांची राज्य आयोग सोडवून करून पीडितांचे जीवन सुखमय होण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ठाम ग्वाही राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी दिली, महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई आयोजित महिला आयोग आपल्या दारी, उपक्रमांचे आयोजन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती, सातारा जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नावर जन सुनावणी झाली यावेळी २४९ हून अधिक महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केल्याचे चाकणकरांनी नमूद केले आहे, यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी पोलीस अधीक्षक समीर शेख मुख्य कार्यकारी अधिकारी योशनी नागराजन यांनी देखील महिलांचे प्रश्न समजावून घेत त्यांच्या शंकाचे निरसन केले आहे, यावेळी रूपाली चाकणकर पुढे म्हणाल्या... महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणीसाठी नेहमीच प्रयत्नशील आहे, राज्यांच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येवुन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिंकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही, त्यामुळे आम्ही आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहोत, महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जन सुनावणी ला पोलीस प्रशासन विधी सल्लागार समुपदेशक जिल्हा समन्वयक आदीं उपस्थित असल्यांने तक्रारीवर त्याच ठिकाणी कारवाई करण्यात येते, आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम हे आयोग करीत आहे, या जन सुनावणीनंतर महिला व बालकांच्या विषयांच्या अनुषंगाने त्यांनी सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली, सातारा जिल्हा प्रशासनांने वारीतील महिलांसाठी विविध सोयी सुविधा पुरविल्या आहेत, याबद्दल देखील चाकणकरांनी समाधानही व्यक्त केले,


0 Comments