LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्यदक्ष संतोष गोसावी यांची पदोन्नतीने मुंबईला बदली, चिंचणी वांगी कोकरुड जनता आणि पोलिसांनी दिला भावुक निरोप

संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी (सांगली जिल्हा) एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली किंवा प्रमोशन झाल्यानंतर सर्वसामान्य जनता आणि अधिकाऱ्यांनी  मिळून शुभेच्छा आणि निरोप देताना चिंचणी (वांगी) यांसह कोकरुड पोलीस ठाण्यातील सर्व सामान्य नागरिकांसह कोकरुड पोलीस ठाण्यातील कर्मचारी देखील भावुक झाल्याचे पहायला मिळले, सातारा,सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या परिसरांतील जनतेशी जनसंपर्क वाढविण्यात भर देवुन कडेगांव चिंचणी वांगी कोथरुड अशा विविध पोलीस  ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हेगारींना देखील आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आपल्या पोलिस ठाणेकडील कर्मचाऱ्यांसमवेत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांची पोलीस निरीक्षक पदोन्नतीने मुंबईला बदली झाल्यांने नुकतेच त्यांना सांगली जिल्हा पोलीस दलातून कार्यमुक्त करण्यात आले होते, त्यांच्याकडे कोकरुड पोलीस ठाण्याचा कार्यभार होता, यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांना पोलीस ठाण्याकडूंन आणि परिसरांतील जनतेकडूंन त्यांचे सहपत्नीक स्वागत करून शुभेच्छा आणि त्यांना भावुक निरोप  देण्यात आला, यावेळी कोकरुड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आणि परिसरांतील जनतेचा भावुक निरोप घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी हे  सुध्दा चांगलेच भारांवून गेले होते, सांगली जिल्ह्यात त्यांनी सर्व सामान्यांचा जनसंपर्क वाढविण्यावर भर वाढवून चांगलेच लोकप्रिय झाले होते, तसेच गुन्हेगारीला देखील आळा घालण्यात संतोष गोसावी नेहमीच प्रयत्नशील राहिले, सांगली जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यात आपली उत्कृंष्ट सेवा दिली, बदली कुठेही झाली तरी चालेल, आपले कर्तव्य चोख बजावणार असा म्हणणारा दबंग आणि जिगरबाज, अधिकारी म्हणून संतोष गोसावी यांची महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्रांच्या पोलीस प्रशासनांत ओळख आहे,

Post a Comment

0 Comments