अनुंजा कारखेले (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाची फसवणूक करून परस्पर विकलेला सुमारे 20 लाखांचा आयशर ट्रक वाई पोलिसांनी नाशिक मध्ये जावुन अखेर ताब्यांत घेतला आहे, या बाबत वाई पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2023 पासून फसवणूक करून परस्पर विकलेले सुमारे ९० लाख रुपये किंमतीचे सहा ट्रक व डंपर वाई पोलीस ठाणेकडील तपासी पथकांने औरंगाबाद हैदराबाद कर्जत व खुलताबाद येथून यापूर्वीही हस्तगत केली आहेत, याच गुन्ह्यातील रोहित रमेश शिंदे यांच्या मालकीच्या आयशर ट्रक (एम एच 11 सीएच 51 60) अनुषंगाने पोलिसांकडे तपासी पथकांने सखोल तपास करून हा ट्रक नाशिक परिसरांत असल्याची माहिती वाई पोलिसांना मिळाली होती, त्या अनुषंगाने वाई पोलीस ठाणे कडील तपासी पथक हे नाशिक येथील म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून इमाम खान या व्यक्तीकडूंन हा ट्रक अखेर ताब्यात घेण्यात आला, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे गुन्हे प्रकटीकरण विभागांचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पोलिस अंमलदार राम कोळी नितीन कदम हेमंत शिंदे श्रावण राठोड विशाल शिंदे यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला, त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्याकडूंन विशेष कौतुक होत आहे,


0 Comments