LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सातारच्या ऐतिहासिक शूरवीरांच्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब प्रयत्नशील,

 (संभाजी पुरीगोसावी) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिनांक ७ जून २०२३ रोजी सातारा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता, पदभार घेतल्यापासून  ऐतिहासिक आणि शूरवीरांच्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी नेहमीच प्रयत्नशील आहेत, तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची राजकीय वर्तुळातून जिल्ह्यातून वर्षातच अचानक बदली करण्यात आली होती, त्यानंतर सांगली जिल्ह्यात सीईओ म्हणून कार्यरत असलेले जितेंद्र डूडी यांना सातारा जिल्हाधिकारी पदभार घेण्याचे आदेश देण्यात आले होते, दिनांक 11 जुलै 2020 मध्ये त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतला होता, त्यांच्या कार्यकाळात मॉर्डल स्कूल अंकुर बालशिक्षण जलजीवन मशीन स्मार्ट पीएसीच्या माध्यमातून जिल्ह्याचा चांगलाच चेहरा मोहरा बदलला होता, राज्यांत प्रथम क्रमांकावर येण्याचा मानही सांगली जिल्ह्याला मिळवून दिला होता यात सर्वाधिक वाटा हा जितेंद्र डूडी यांचा होता, जितेंद्र डूडी हे मूळचे जयपूर (राजस्थान) येथील असून ते 2016 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत, सुरुवातीला झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती केंद्र शासनाचे सहाय्यक सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते, महसूल खात्यात एक शिस्तप्रिय आणि सर्वांना सोबत घेवुन काम करणारा तसेच सामान्य लोकांसाठी कायम कार्यालयाचा दरवाजा खुला असणारे अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ओळख आहे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या पत्नी आँचल दलाल-डुडी मॅडम या सातारा जिल्ह्यात आयपीएस अधिकारी म्हणून काम पाहत आहेत, त्यांची महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात एक कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख आहे, जिल्हाधिकारी यांच्या कामकाजावर संपूर्ण जिल्हावासीय हे समाधानकारक आहेत, पदभार घेतल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामांना प्रथम प्राधान्य दिले आहे, नेहमीच पत्रकारांच्या सहवासात आणि जिल्हा वासियांच्या जनतेच्या मना मनात राहून ऐतिहासिक जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे जिल्ह्यातील  विविध विभागांच्या खात्यातील अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना सोबत घेवुन नेहमीच प्रयत्नशील दिसून जिल्हा वासियांना चांगलेच येत आहेत,

Post a Comment

0 Comments