LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

जायगांव-रहिमतपूर बस सेवा सुरू विद्यार्थी ग्रामस्थांची अखेर मागणी पूर्ण, कोरेगांवच्या आगार व्यवस्थापकांकडून दिलासा

अनुंजा कारखेले मॅडम (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. बऱ्याच वर्षापासून प्रामुख्याने शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांतून आग्रही मागणी असलेल्या जायगांव ते रहिमतपूर दरम्यान तीन बस सुरू झाल्या आहेत नुकत्याच त्याचा पारंभ झाला आहे, त्यामुळे प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीची गैरसोय ही दूर झाली आहे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वासुदेव माने यांच्या विशेष प्रयत्नांतून जायगांव ग्रामपंचायतचे सातत्याने एसटी महामंडळाकडे केलेल्या पाठपुरवठ्यामुळे आज श्रीफळ वाढवून या बससेवेचा प्रारंभ झाला आहे, सातारा जिल्हा विभाग वाहतूक नियंत्रक रोहन पलंगे विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड मॅडम कोरेगांव आगारांचे व्यवस्थापक शंकर यादव यांच्याकडूंन जायगांव गावातील व परिसरांतील प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे, यावेळी ग्रामस्थांनी एसटीचे पूजन करून चालक माने वाहक भोसले यांचाही सत्कार केला, सदर बस ही सातारा बस स्थानकांतून सातारा रहिमतपूर  सायंकाळी  ७.४५ मिनिटांनी सातारा बस स्थानकांतून जायगांव मुक्कामी सुरू झाली आहे, सकाळी ६.४५ वाजता जायगांव ते रहिमतपूर एसटी बस सेवा सुरू झाली आहे, दिवसातून तीन वेळा रहिमतपूर मध्ये शिक्षणासाठी व बाजारपेठेत ये,जा करण्यासाठी जायगांव ग्रामस्थासह पंचक्रोंशीतील ग्रामस्थांची चांगली सोय झाली आहे, त्यामुळे गावासह पंचक्रोंशीतील ग्रामस्थातून आणि विद्यार्थयातून आनंदाचे समाधानाचे वातावरण आहे,

Post a Comment

0 Comments