अनुजा कारखेले मॅडम प्रतिनिधी. छ. संभाजीनगर महानगरांच्या पोलीस आयुक्त पदी आयपीएस अधिकारी प्रवीण पवार यांची राज्य गृह विभागाने मंगळवारी त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले होते, यापूर्वी पुण्याचे सह पोलीस आयुक्त म्हणून काम पाहत होते, गुरुवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला आहे, यावेळी आयपीएस अधिकारी आणि सध्याचे पोलीस आयुक्त संदीप जी. पाटील यांनी त्यांचे स्वागत करीत पदभार सोपविला आहे, सध्या पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार संदीप पाटील यांच्याकडे होता, संदीप पाटील हे नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत, पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहिया हे 30 में रोजी निवृत्त झाले होते, त्यानंतरचा प्रभार हा संदीप पाटील यांच्याकडे होता, नूतन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे संदीप पाटील यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी स्वागत केले, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दांडगा अनुभव आहे, पोलीस उपअधीक्षकांपासून पोलीस सेवेत पारंभ केलेल्या पवार यांनी संभाजीनगर पोलीस दलाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर यापूर्वी काम केले आहे, त्यानंतर त्यांनी मुंबई पुणे ठाण्यासह राज्यांत विविध ठिकाणी काम पाहिले आहे, सध्या ते पुण्याचे सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहत होते, नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे डॅशिंग, अधिकारी म्हणून परिचित असलेल्या आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे शहरांचा पोलीस आयुक्त पदाचा पदभार शासनाने सोपवला होता, मोठ्या राजकीय हस्तक्षेपामुळेच संदीप पाटील यांची पूर्णवेळ नियुक्ती होऊ शकली नाही, नसल्याची चर्चा सध्या पोलीस आयुक्तालयासह राजकीय गोट्या सुरू होती,


0 Comments