LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सातारा तालुका पोलिसांनी चोरीस गेलेले ६ तोळे सोने चांदी केली हस्तगत, सातारा तालुका पोलिसांची कामगिरी,

अनुंजा कारखेले (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे मागील काही महिन्याभरांपासून अतिरिक्त पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक निलेश तांबे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसमवेत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत, सातारा तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वडूथ येथील सौ. दिपाली संतोष बोराटे यांच्या घरांतून दिनांक २१/०६/२०२४ रोजी ६ तोळे सोने व चांदीचे दागिने चोरून घेवुन गेल्याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली होती, त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी आपल्या पोलीस ठाणेकडील डी.बी पथकांला सूचना दिल्या होत्या, सातारा तालुका पोलीस ठाणेकडील डी.बी पथकांने गोपनीय माहिंतीच्या आधारे एका संशयित महिलेस मौजे कळंबे ता.जि.सातारा) येथून ताब्यात घेवुन तिच्याकडे सखोल चौकशी केली असता, सदर महिला ही नात्यातीलच असल्यांचे तपासात निष्पन्न झाले, तिच्याकडूंन चोरीस गेलेले ६ तोळे सोने व चांदीचे दागिने हस्तगत करून सदर संशयित महिलेस सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले पोलीस निरीक्षक निलेश तांबे गुन्हे प्रकटीकरण विभागांचे पोलीस उपनिरीक्षक एस.के शिंदे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव पो.हवा.राजू शिखरे पो.हवा. मालोजी चव्हाण पो.ना. किरण जगताप पो. कॉ.शिवाजी डफळे पो.कॉ.संदीप पांडव होमगार्ड विवेक शेडगे विठ्ठल सावंत आदीं पोलिसांनी या कामगिरीत सहभाग घेतला, त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी विशेष कौतुक करीत अभिनंदन केले,

Post a Comment

0 Comments