LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

कोकरूड पोलीस ठाण्यांचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांनी स्वीकारला पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांची मुंबईला बदली

अनुजा कारखेले (सांगली जिल्हा) प्रतिनिधी. महाराष्ट्र पोलीस दलातील गेल्या काही वर्षांपासून पोलीस निरीक्षक या पदोन्नतीची प्रतीक्षा लागण होती, मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पदोन्नतीने बदल्या केल्याने पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले, दरम्यान सातारा सांगली या जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा बजवलेल्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दत्तगिरी गोसावी यांना देखील पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील चिंचणी (वांगी) यासह कोकरूड पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार उत्कृंष्टरित्या सांभाळला होता, तर चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्यात त्यांनी सलग २वर्षे दोन २ महिने पोलीस ठाण्याचा कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढविण्या बरोबरच गुन्हेगारीला देखील चांगलाच आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, शांतता आणि प्रस्थापित करण्याला महत्व दिले होते, त्यामुळे चिंचणी (वांगी) कोकरूड या परिसरातील जनतेच्या ते चांगलेच लोकप्रिय झाले होते, सातारा,सांगली या जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली, बदली झाली तरी चालेल आपले कर्तव्य चोख बजावणारा असा, म्हणणारा दबंग आणि चिगरबाज, अधिकारी म्हणून संतोष गोसावी यांची महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात ओळख आहे, त्यांच्या रिक्त जागेवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशावरुन कोकरूड पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांनी मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्याकडूंन कोकरूड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यांतील मोही गावचे आणि शेतकरी कुटुंबातील सुपुत्र आहेत,

Post a Comment

0 Comments