अनुजा कारखेले मॅडम (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. वाई पोलीस ठाण्याच्या परिसरांतील वाई गणपती घाटाजवळ रोडच्या बाजूला व्यवसाय करणाऱ्या लक्ष्मीकांत रंगराव जाधव (रा.वाढे फाटा ता.जि. सातारा ) यांना तडीपार इसम अक्षय गोरख माळी व वसंत ताराचंद घाडगे यांनी कोयत्याचा धाक दाखवून व एअर गनने मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने आणि दहशत माजण्याच्या हेतूने घेवुन पसार झाले होते, याबाबत तडीपार दोन इसमांवर वाई ठाण्यात भा.द.वि. कलम 394 34 142 अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल होता, त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी पोलीस ठाणेकडील तपासी पथकांला सूचना दिल्या होत्या, वाई पोलीस ठाण्याकडे तपासी पथकांने गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त करून घेत या दोन तडीपार आरोपींना अखेर ताब्यांत घेवुन पोलीस ठाण्यात आणले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानुसार दोन्ही तडीपार आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण सुधीर वाळुंजे राम कोळी हेमंत शिंदे श्रावण राठोड विशाल शिंदे प्रसाद दुदुस्तकर नितीन कदम आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला, वाई पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम यांनी अभिनंदन केले,


0 Comments