लोकसभा निवडणुकीत ठरल्या होत्या वादग्रस्त, अविनाश पाठक बीडचे नवे कलेक्टर
(बीड जिल्हा) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे मॅडम यांची बदली बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अविनाश पाठक हे सध्या बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते, त्यांची या पदावरून बीड जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे, राज्यांतील लक्षवेधी आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची लढत चांगलीच झाली होती, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विरुद्ध महायुतीच्या पंकजा मुंडे मॅडम यांच्यात सामना रंगला होता, त्यामध्ये बीडची निवडणूक ही अत्यंत रंगतदार झाली, निवडणूक प्रचारांत बीड मतदारसंघात जातीय तेढ पाहायला मिळाले, लोकसभा निवडणूक कालावधीत बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे मॅडम यांच्यावर राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या शरद पवार गटाने अनेक आरोप केले होते, बीडच्या लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकारी चांगल्याच वादग्रस्त ठरल्या होत्या, अखेर दीपा मुधोळ-मुंडे मॅडम यांची बीड जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली आहे, अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने दीपा मुधोळ-मुंडे मॅडम यांची बदली करण्यात आल्याचं पत्र पाठवण्यात आले आहे, तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे मॅडम यांच्याकडे अद्याप कोणताच पदभार सोपविण्यात आला नाही,


0 Comments