अनुंजा कारखेले मॅडम प्रतिनिधी (पुणे जिल्हा) आषाढी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे पायी निघणाऱ्या महिला वारकऱ्यांची संख्या ही लक्षणीय असते, या महिला वारकऱ्यांच्या स्वच्छता आणि सुरक्षितेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगांने गेल्या दोन वर्षापासून आरोग्यवारी या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्यांचे राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी सांगितले आहे, यावेळी चाकणकर पुढे म्हणाल्या... महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे, संतांनी आपल्या जन जागृतीच्या कार्याच्या माध्यमांतून महाराष्ट्र अध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे, आषाढी वारीच्या निमिंत्ताने वारकरी महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यांतून देहू आळंदी पंढरपूर येथे दाखल होत असतात, या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते, वेगवेगळ्या वयोगटातील तसेच महाराष्ट्रांतील वेगवेगळ्या भागांतून लाखों वारकरी महिला या पंढरीची वाट दरवर्षींच चालत असतात, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री. संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पायी वारी सोहळ्यांच्या अनुषंगाने यंदाची ही वारी महिलांसाठी आरोग्यवारी असणार आहे, याकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडूंन तीन जिल्ह्यात आरोग्यांच्या सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे,


0 Comments