संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. बारामती तालुक्यांतील निंबुत येथे सुंदर नावांच्या बैलाच्या व्यवहारांतून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती, या गोळीबारात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांचा उपचारांदरम्यान दरम्यान मृत्यू झाला, त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे, सुंदर नावांच्या बैलाच्या वादांतून निंबाळकर आणि काकडे यांच्यामध्ये वाद झाला होता, याच वादांतून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता, यानंतर गौतम काकडे यांना अटक करण्यासाठी वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी आंदोलन केले, तसेच गौतम काकडे यांना अटक करा यासाठी रणजित निंबाळकर यांच्या पत्नीने आत्मदहनांचा इशारा देखील दिला होता, दरम्यान पोलिसांनी गौतम काकडे याला अखेर अटक केली आहे, या प्रकरणातील गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना देखील पोलिसांनी या पूर्वीच अटक केली होती,*


0 Comments