LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महाबळेश्वर पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक संपन्न, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे

 संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. महाबळेश्वर  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील यांची नवीन कायदा व आपत्ती व्यवस्थापन या अनुषंगाने बैठक घेतली. दिनांक ०१ जुलै २०२४ पासून लागू झालेल्या नवीन कायद्याची सर्वांना माहिती देवुन मार्गदर्शन करण्यात आले,तसेच महाबळेश्वर परिसरांत मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यांने सर्व आपापल्या गावांतील पोलीस पाटील यांनी गावात हजर राहून सतर्क रहावे तसेच गावातील वादीवाद तंटे गावातच मिटवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ आपत्ती व्यवस्थापन समिती किंवा पोलीस स्टेशनला संपर्क करणेबाबत सूचना दिल्या. गावातील अडीअडचणी बाबतची माहिती घेवुन चर्चा करण्यात आली, सदरची पोलीस पाटलांची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्यासह पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती,

Post a Comment

0 Comments