अनुंजा कारखेले ( बीड जिल्हा ) प्रतिनिधी. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडूंन स्वीकारला आहे ,सामान्य प्रशासन विभागांचे अप्पर मुख्य सचिव सेवा यांनी अविनाश पाठक यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोपविण्या बाबतचे आदेश काढले होते, त्या आदेशाप्रमाणे आज दीपा मुधोळ-मुंडे यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत करीत जिल्हाधिकारी पदाचा पदभार श्री. अविनाश पाठक यांच्याकडे सोपविला आहे, तर मावळत्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तत्पूर्वी अविनाश पाठक हे बीड जिल्ह्यातच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते, त्यांनी तेथील पदाचा कार्यभार हा संगीता देवी पाटील यांच्याकडे सोपविला आहे, याप्रसंगी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आर्पिता ठुबे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी कविता जाधव महेंद्र कुमार कांबळे यांच्यासह वेगवेगळे विभागांचे विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते, अविनाश पाठक यांनी बीड जिल्हा महसूल प्रशासनात काम पाहिले आहे, त्यामुळे अविनाश पाठक यांना बीड जिल्ह्यातील महसूल प्रशासनांचा मोठा अनुभव असून, आता जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहताना त्यांच्या शिस्तप्रिय प्रशासनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाला दिशा मिळेल अशी अपेक्षा बीडकरांमधून व्यक्त केली जात आहे,*


0 Comments