*उरण व शिळफाटा येथे महिलांवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पंढरपूर यांच्याकडून महाराष्ट्र सरकार आणि गृहमंत्री व सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला*
*गृहमंत्र्यांना बांगडी चोळीचा आहेर करण्याचा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला*
*महिलांना सुरक्षा मिळावी महिलांच्या सुरक्षित वाढ व्हावी गुन्हेगारांना तात्काळ फाशी मिळावी या संदर्भात आज पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी चौकात महायुती सरकारचा निषेध करण्यात आला*
*यावेळी तालुकाध्यक्ष संदीपदादा मांडवे,महिला तालुकाध्यक्षा राजश्रीताई ताड, शहराध्यक्षा सुनंदा उमाटे, सोमनाथ गोरे, दत्तात्रेय माने, नवनाथ मोरे, मनीष पवार, अमोल खिलारे, संजय शिंदे, विजय गायकवाड, अभिजीत कवडे व अनेक महिला भगिनींनी महाराष्ट्रातल्या या काम चुकार व कुचकामी सरकारचा निषेध केला*
0 Comments