दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
संभाजी पुरीगोसावी (जालना जिल्हा ) प्रतिनिधी. जुगार, घरफोडी,वाहन चोरी,अवैध धंदे विनापरवाना शस्त्रे यासारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्या आधीच जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रे तलवार बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेवुन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या आदेशांत नुकताच पदभार स्वीकारलेले स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी आपल्या एलसीबीच्या पथकाला सूचना देवुन वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींची माहिती शोध घेत असताना खबऱ्यामार्फत दोन्ही इसमानी जिल्ह्यात पोस्टाच्या पार्सलद्वारे तलवारी मागवलेल्या होत्या. सदर डिलिव्हरी साठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने सापळा लावून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी नामे.(आदित्य राजू काटकर व मंगेश राजू काटकर) यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या कब्जांतून सुमारे एकूण 22 तलवारी 44.000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज जाधव स.पो.नि. योगेश उबाळे स.पो.नि. शांतीलाल चव्हाण पो.उपनि राजेंद्र वाघ संजय राऊत भाऊराव गायके रमेश राठोड विजय डिक्कर रुस्तुम जैवाळ प्रशांत लोखंडे सागर बाविस्कर संभाजी तनपुरे देविदास भोजने यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
0 Comments