LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 पंढरपूर, माढा झंझावात दौरा, भव्य कुस्ती, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महाआरोग्य शिबिर, नेत्र तपासणी होणार 

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिताभ पाटील यांचे ३९ व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम तसेच पंढरपूर सह माढा, मंगळवेढा मतदारसंघात झंजावात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी नेहमीच सर्वांशी आपलेपणाने वागत असल्याने त्यांची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असले तरीही त्यांच्या नेतृत्वावर अनेक जण आकर्षिले जात असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्तीचे मैदान, भव्य रक्तदान शिबिर, पर्यावरण पूरक वृक्षारोपण, महाआरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा झंजावात दौराही नियोजित करण्यात आला असून गुरुवार दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता श्री संत नामदेव पायरी येथे महाआरती करण्यात येणार आहे., यानंतर सकाळी साडेनऊ वाजता टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित राहणार आहेत., सकाळी साडेदहा वाजता अरण येथील श्री संत सावता माळी मंदिराचे दर्शन व त्या ठिकाणी उपस्थिती, सकाळी ११ वाजता माढा येथील माढेश्वरी मंदिराचे दर्शन व उपस्थिती, दुपारी २ वाजता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर औदुंबर अण्णा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन, दुपारी ४ वाजता मंगळवेढा येथील संत दामाजी पंत मंदिर, जय भवानी मंदिर, संत चोखामेळा समाधी, पिर साहेब दर्गा येथे दर्शन व उपस्थिती यानंतर सायंकाळी ७ वाजता पंढरपुरी येथील जनसंपर्क कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराने भरगच्च समाज उपयोगी कार्यक्रम घेतले असून प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून जनतेचे प्रेम आणि आदर स्वीकारण्यासाठी तत्पर राहणार असल्याची माहिती त्यांचे निकटवर्ती नितीन सरडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments