
----------------------------------------------------------------------------
पंढरपूर: (प्रतिनिधी) रुक्मिणी सहकारी बँकेच्या वतीने शहर व तालुक्यातील महिलांसाठी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बँकेच्या संस्थापक सचिवा सुनित्राताई पवार यांनी दिली .
या कार्यक्रमांमध्ये पोरा एक थेंब पानावरून घसरला, कळीच्या गालावर क्षणभर विसावला, आणि अलगद कुजबुजला सखे श्रावण आला ,श्रावण आला अशा या हिरवाईच्या ऋतूमध्ये आपण भेटूयात साऱ्याजणी मंगळागौरीच्या खेळाचा आनंद घ्यायला. श्री. रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापक सचिवा सुनेत्राताई पवार यांचे शुक्रवार दि .२८/०८/२०२४रोजी सकाळी ११=००वाजता श्रीराम मंगल कार्यालय, इसबावी पंढरपूर येथे खास सखी साठी तिचं माझं व्यासपीठ कार्यक्रमांतर्गत श्रावण सरी "मंगळागौर "स्पर्धेचे आयोजन केले आहे. या अंतर्गत स्मार्ट सासूबाई , नथ विषयी चारोळी महाराष्ट्रीयन वेशभूषा, डोळे बांधून दहीहंडी फोडणे इत्यादी स्पर्धासह खवय्यांसाठी स्टॉलचेही आयोजन केले आहे.
मंगळागौर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु.१०,०००/- व ट्रॉफी द्वितीय पारितोषिक रु.७०००/- व ट्रॉफी देऊन तर इतर स्पर्धांसाठी आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
यामधील सहभागासाठी जास्तीत जास्त महिला व महिला मंडळांनी भाग घेण्यासाठी विभावरी डुबल , ९१७५६०५१३३, सविता लोखंडे८३९०३१६७२७ , राणी गावडे ८३७९८९०३५७ ,वैशाली कदम ७०२८१०७७६९ यांचेकडे संपर्क साधण्याचे कार्यक्रमाच्या संयोजिका सुप्रिया पवार यांनी यासाठी आवाहन केले आहे.

0 Comments