श्री.दशनाम गोस्वामी समाज संस्था सातारा जिल्हा या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष श्री. जगन्नाथ गिरी-गोसावी हे ७३ वर्ष पूर्ण करून आता ७४ वर्षात पदार्पण करीत आहेत, जगन्नाथ गिरी गोसावी हे शिववंशीय समाज व समाधी बचाव समिती महाराष्ट्र शासन या संस्थे मध्ये ही कार्यरत आहेत .
गोसावी समाजामध्ये व अन्य समाजामध्ये ते सर्वाच्या सुख दुखात नेहमीच सहभागी असतात त्याचप्रमाणे गोसावी समाजा मधील समाज बांधवांवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असतो अथवा केला जातो त्या ठिकाणी ते स्वःता समाज बांधवाना सोबत घेवून उपस्थितीत रहात असतात, तसेच आर्थिंक सहकार्य सहकार्यातही मोठे योगदान आहे, समाजातील विविध कार्यक्रमांना आपला अनमोल वेळ काढूनही नेहमीच उपस्थिती असते, त्यांचे समाजातील काम उत्कृंष्ट असल्यामुळे ते महाराष्ट्रांतील सर्व समाज बांधवाचे ते चांगलेच परिचयाचे आहेत, समाजामध्ये ( तात्या ) या नांवाने त्यांची ओळख आहे,
मा. जगन्नाथ गिरी-गोसावी हे एक वृक्ष प्रेमी असुन आपल्या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर सहकार्या सह अनेक वृक्ष लागवड करून ती झाड जतन व संवर्धन करण्याचे काम सुरु आहे,
जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गिरी गोसावी ( तात्या ) आता आपले ७३ वर्षे पुर्ण करून ७४ वर्षात पर्दावन करून ते आपला वाढदिवस साध्या पद्धतीने घरगृती साजरा करीत आहेत. तात्या बद्दल बोलायचे झाले तर शब्द कमीच पडतील... असे त्यांचं आज समाजामध्ये व्यक्तिमत्व आहे, सर्वांसाठी ते देवदत्त ठरत आहेत असे म्हणण्यात काय वावगे ठरणार नाही... शांतप्रिय आणि मनमिळावू स्वभाव असल्यामुळे कोणताही प्रश्न त्यांच्यासमोर उभा असला तरी त्या विषयावर तळागाळापर्यंत पोहोचून विचार करूनच योग्य तो निर्णय घेणार ... तात्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यांच्या निमिंत्ताने सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

0 Comments