🟣👉 *निवेदनाद्वारे खासदार प्रणिती शिंदे यांची प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी*
दिनांक : ०६ ऑगस्ट २०२४
पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा नदी काठावरील शहरी व ग्रामीण भागात पुर नियंत्रण कक्ष व संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने प्रतिनिधीचे शिष्टमंडळ मनोज यलगुलवार, संदीप पाटील, अमर सूर्यवंशी, किरणराज घाडगे, आदित्य फत्तेपुरकर, प्रशांत शिंदे, मिलिंद भोसले, जितू वाडेकर, आणि स्वीय सहाय्यक योगेश जोशी, समाधान हाके यांनी पंढरपूर मोहोळ तालुक्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांना पंढरपूर प्रांतकार्यालय येथे देण्यात आले.
या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की, सध्या उजनी व वीर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात येत आहे यामुळे भीमा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून पूर परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे भीमा नदीकाठच्या पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील व पंढरपूर शहरातील सकल भागात पाणी शिरत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना आपल्या प्रशासनाकडून तात्काळ करण्यात याव्यात तसेच पूरग्रस्त स्थलांतरित नागरिकांची इतर सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करून त्यांना इतर सोयी सुविधा देण्याचे नियोजन करण्यात यावे. याकरिता आपली आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवून संबंधित यंत्रणा तात्काळ आदेश देण्यात यावे. तसेच ग्रामीण भागातील भीमा नदीकाठच्या पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करावे व त्या स्थलांतरित नागरिकांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी प्रांताधिकारी सचिन ईथापे यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केलेल्या सूचनेचे पालन करून पुर नियंत्रण कक्ष, आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेऊन नागरिकांना मदत करण्यात येईल असे सांगितले.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments