*🌹यशवंतांचा गुणगौरव 🌹*
सावरकर प्रेमी मंडळ पंढरपूर संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत धवल यश संपादन केल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मंडळाचे संचालक श्री शांताराम कुलकर्णी सर, प्रा .मेधा दाते, डॉ.श्री. मिलिंद जोशी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष भोसेकर यांनी केले. स्पर्धा परीक्षेत धवल यश मिळवलं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री स्वप्निल भंडारे (सीए), श्री हर्षवर्धन शिंदे (सीए), श्री जीवन कदम (ग्रामसेवक) श्री विशाल पिसे (महाराष्ट्र पोलीस) रूपाली कांबळे (कॅनॉल इन्स्पेक्टर) गौरी राजगुरू (कनिष्ठ अभियंता जलसंपदा)
सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना श्री जीवन कदम यांनी आपला स्पर्धा परीक्षेत ला संघर्ष सांगितला. त्यानंतर गौरी राजगुरू यांनी आजचं यश हे आपल्या अभ्यासिकेला समर्पित केले. रूपाली कांबळे यांनी आपल्या मनोगतात जीवनातील प्रचंड संघर्ष आणि त्यावर जिद्दीने कशी मात केली ते थोडक्यात सांगितले. संचालिका प्रा. मेधा दाते यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शांताराम कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना येथोचित मार्गदर्शन केले. प्रशासनात जात असताना आपण कसं वागायचं याचं भान आजच्या पिढीने ठेवलं पाहिजे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असणारे समाधान अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही यावे या सदिच्छा व्यक्त करून सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यानंतर आभार डॉ. श्री मिलिंद जोशी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले
अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी सत्कार समारंभानंतर प्रचंड जल्लोष केला. कार्यक्रमाचे सांगता झाली.
🎉🎉💐💐🌹🌹🎉🎉
0 Comments