कर्तव्यदक्ष ... जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांच्या बदलीमुळे भंडारा जिल्हा पोलीस दल भावनिक झाला, संभाजी पुरीगोसावी (भंडारा जिल्हा) प्रतिनिधी. भंडारा जिल्ह्यात आत्तापर्यंत अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सेवा दिली आहे त्यापैकी काही अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आपल्या कामाची इच्छा पडली आहे भंडाऱ्यात कार्यरत असणारे आणि नुकतीच बदली झालेले कर्तव्यदक्ष ... जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी मताने यांनी देखील आपले धडाकेबाज निर्णय आणि भूमिकांच्या अंमलबजावणीने भंडारकरांच्या मनावर राज निर्माण केले आहे, पोलीस अधीक्षकांच्या वाढदिवसा दिवशीच झालेल्या बदलीमुळे जिल्ह्यातील अनेक पोलिस अधिकारी कर्मचारी देखील भावनिक झाले आहेत, नागपूर शहर पोलीस दलात उपायुक्त म्हणून कार्यरत असताना मतांनी यांनी चौकटीच्या बाहेर जात अनेक महत्त्वांचे उपक्रम राबविले होते, कोविड महासाथ असताना नागपुरांतील एका वयोवृद्ध महिलेला मतांनी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रातोरात घर बांधून दिले होते, कोविडची महासाथ आणि तुफान पाऊस, असे तेव्हाचे वातावरण होते, मतांनी यांच्या कार्याचा फोटो सोशल मीडियावर देखील चांगलाच प्रचंड व्हायरल झाला होता, नागपूर शहरांत डीसीपी म्हणून कार्यरत असताना कोणताही वाद त्यांच्या भोवती कधीच निर्माण झाला नाही, उपराजधानीतील कार्यकाळ पूर्णता: झाल्यानंतर लोहित मतांनी यांची बदली भंडारा जिल्ह्यात करण्यात आली होती, भंडारा येथे मतांनी यांच्या नावाभोवती वादाचे वलय निर्माण झाले नाही, यूपीएससीच्या परीक्षेत देशभरांतून 188 वा क्रमांक प्राप्त करणारे 34 वर्षीय लोहित मतांनी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोलाचे कार्य केले, तसेच जिल्ह्यातील अनेक पोलीस कुटुंबाचे पितृत्व देखील त्यांनी स्वीकारले होते, पोलिसांच्या कुटुंबातील तरुणाईला त्यांनी रचना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केले, पोलिसांच्या परिवारांसाठी भंडाऱ्यात कौशल्य योजना ही देखील त्यांनीच सुरू केली होती, पोलिसांच्या कुटुंबातील महिलांना आर्थिंकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी विविध उपक्रम राबविले होते, लोहित मतांनी यांनी भंडारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून 4 ऑगस्ट 2022 रुजू झाल्यापासून जिल्ह्यातील नागरिकांशी समन्वय ठेवून जनसंपर्क वाढवून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आणि त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये भंडारा जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा दिली आहे,
0 Comments