LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

२९ दुचाकी मूळ मालकांना केल्या परत अपघातात व बेवारस दुचाकीचा समावेश, वाहन धारकांनी मानले सातारा पोलीस दलाचे आभार

२९ दुचाकी मूळ मालकांना केल्या परत अपघातात व बेवारस दुचाकीचा समावेश, वाहन धारकांनी मानले सातारा पोलीस दलाचे आभार, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. कराड उपविभागीय कार्यक्षेत्रातील उंब्रज पोलीस स्टेशनच्या आवारांतील अपघातातील व बेवारस 29 वाहनांची माहिती घेवुन वाहनांच्या मूळ मालकांना पत्ता शोध घेवुन मूळ मालकांना परत करण्यात आल्या आहेत, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रवींद्र भोर यांनी पोलीस स्टेशन आवारांमध्ये अपघातातील व बेवारस वाहने याची माहिती घेवुन मुद्देमाल कारकून पोलीस हवा (1252) दीपक जाधव यांना अपघातातील व बेवारस वाहनांचा शोध घेवुन मूळ मालकांना परत करणेबाबत आदेशित करण्यात आले होते, त्याचप्रमाणे पो. हवा संजय धुमाळ पो. कॉ. मयूर थोरात पो. कॉ.गणेश कुंदे पो.कॉ. मासाळ होमगार्ड जंगम खंडाईत तसेच विजय ओतारी यांनी माहिती घेवुन मूळ मालकांचा शोध पत्ता घेवुन त्यांना संपर्क करून उंब्रज पोलीस ठाण्यात उंब्रज पोलीस स्टेशनमध्ये बोलवून एकूण 29 दुचाकी वाहने मूळ मालकांच्या ताब्यांत देण्यात आली आहेत, यावर वाहनधारकांनी उंब्रज पोलीस ठाण्यासह सातारा पोलीस दलाचे देखील आभार मानले आहे, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रवींद्र भोर पो. हवा. दीपक जाधव पो. कॉ.मयूर थोरात पो.कॉ. गणेश कुंदे पो.कॉ. मसाज विजय ओतारी आदीं पोलिसांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.

Post a Comment

0 Comments