LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात एका विवाहितेवर तीघां मित्रांचा जबरी अत्याचारइज्जतेपोटी त्या विवाहितेने केली आत्महत्या,या घटनेने मंगळवेढा हादरला

मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात एका विवाहितेवर तीघां मित्रांचा जबरी अत्याचार

इज्जतेपोटी त्या विवाहितेने केली आत्महत्या,या घटनेने मंगळवेढा हादरला

मंगळवेढा(प्रतिनिधी)

 मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात एका विवाहित महिलेवर तीघा मित्रांनी जबरी अत्याचार करून शारिरिक,मानसिक त्रास देवून सदरची बाब कोणास सांगितल्यास तुइया दोन मुलांना जीवे मारून टाकेन अशी धमकी दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून इज्जतीपोटी त्या महिलेने तलावात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने संपूर्ण मंगळवेढा तालुका हादरून गेला आहे. दरम्यान या प्रकरणी सुरज सुभाष नकाते (वय 29),तोसिफ चाँदसाो मुजावर (वय 24), शुभम मोहन नकाते (वय 24) या तीघांना पोलिसांनी तात्काळ जेरबंद केले आहे.


पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,यातील फिर्यादी तथा मयताचे पती व त्यांचे मुलाबाळासह कुटुंब हे पुणे येथे रहावयास होते.दि.28 जुलै 2024 रोजी सहकुटूंब त्यांच्या मूळ गावी आले होते. यातील आरोपी हा नातेवाईक असल्याने तो नेहमी पुणे येथे घरी फिर्यादी घरी नसतानाही ये जा करीत असे. तो नातेवाईक असल्याने मयताच्या पतीला कुठलाही संशय आला नव्हता.यातील वरील तीघे आरोपीं हे खास मित्र आहेत. दि.21 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वा. यातील मयत विवाहिता ही तीच्या आईला भेटण्यासाठी घरी जावून येते असे सांगून गेली होती.दुपारी 4.15 वा.एका गृहस्थाने मयताच्या पतीस फोन करून सांगितले की,तुमची पत्नी ही तलावात बुडून मयत झाली आहे. हे कळताच फिर्यादी हे तात्काळ घटनास्थळी पळत गेल्यावर त्यांना तलावाच्या काठावर पत्नीचा मोबाईल व चप्पल दिसून आली.लोकांनी मयतास बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून ती मयत झाल्याचे सांगितले.तदनंतर मयताचे मोबाईल हिस्ट्री चेक केली असता वरील तीघे आरोपी सातत्याने मयतास अनैतिक संबंध ठेवणेबाबत तीला शारिरिक त्रास देत असल्याने त्या त्रासास कंटाळून तलावात उडी मारून आत्महत्या केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान,नुतन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी.विक्रांत गायकवाड,पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवून तीघा आरोपींना तात्काळ गजाआड केले आहे.तपासिक अंमलदार पोलिस उपनिरिक्षक पुरुषोत्तम धापटे यांनी तीघा आरोपींना अटक करून न्यायालयात उभे केले असता सुरज नकाते याला तीन दिवस,तोसिफ मुजावर यास दोन दिवस व शुभम नकाते याला चार दिवस अशी पोलिस कोठडी मिळाली असल्याचे तपासिक अंमलदार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments