सध्याच्या परिस्थितीत सामाजिक गढूळपणा वाढत चाललेला असून हे वातावरण चांगलं होण्यासाठी प्रत्येकाने शांत राहणे गरजेचे असल्याचे मत आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.
माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांच्या वतीने विस्तार पार्टीचे आयोजन आमदार अभिजीत पाटील संपर्क कार्यालय माढा येथे करण्यात आले होते. माणुसकीने वागणे हाच खरा धर्म असून ईश्वर, अल्ला यांनी एक शिकवण दिलेली आहे. त्यांच्या विचारावर आपण चालले पाहिजे असे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. रमजान सणासाठी दीड कोटी लिटर भेसळयुक्त दूध विक्री करणारे विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली ची माहिती अभिजीत पाटील यांनी दिली.
निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज भक्कमपणे पाठीमागे उभे राहिला मतदान आर्शीवादरूपी मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकत आहे. भरघोस निधी देऊन विकास कामे करण्यासाठी मी कायम कटिबद्ध असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांमध्ये सण येतात जातात परंतु कधीच लोकप्रतिनिधींनी आमच्या समाजासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केली नसल्याची खंत वाटली, परंतु आता नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करून सर्वाना एकत्र केले.यामुळे समाजात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरणपाहायला मिळाले अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या.
यावेळी नगरसेवक शहाजी साठे, राजाभाऊ चवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनंतराव कानडे, भाऊसाहेब देशमुख, शंभूराजे साठे, आबासाहेब साठे, संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे, बागुल बागवान, बशीर आतार, मुजीब तांबोळी, जहीर मनेर, फारुख शेख, इसाक कुशेरी, शरीफ कुशेरी, जितू जमदाडे, वायजी भोसले, अभिजीत साठे, अभिजीत उबाळे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते
*चौकट:*
*रेल्वे गाड्यांना थांबण्यासाठी प्रयत्नशील*
माढा रेल्वे स्थानकावर जास्तीत जास्त रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा व सुखसुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील असून या माढा स्टेशन ठिकाणाहून मी स्वतः मुंबईकडे प्रवास करत असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
आमदार अभिजीत पाटील.
0 Comments