दत्त शाबरी आश्रमाच्या साध्वी धर्म सिंहणी डॉ.गायञीदीदी वर झालेल्या हल्ल्या बाबत पंढरपूर चे उपविभागीय अधिकारी मा.सचिनजी इथापे साहेब यांना पंढरपूर सोनार समाज उपाध्यक्ष लंकेश काकासाहेब बुराडे यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
सोनार समाजाच्या साध्वी धर्म सिंहणी डॉ.गायञीदीदी मुंडलिक व त्यांचा भाऊ किरण मुंडलिक हे हिंदुधर्म गोरक्षण सेवा समितीच्या माध्यमातून गोसेवा करीत गो-रक्षण करीत आसून त्यांचा रामनगर तांडा ता.अंबड येथे दत्त शाबरी नावाचा आश्रम आहे, त्यांनी काही दिवसापुर्वी पोलीसांच्या मदतीने गोमांस पकडून दिले याचा राग मनात धरून त्यांच्यावर समाज कटंकानी हाल्ला केला त्या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येवून साध्वी गायञीदीदींना न्याय मिळवून द्यावा अशी लेखी विनंती या अर्जात करण्यात आली, अन्यथा सर्व शाखीय सोनार समाज व समाजातील विविध संघटनांना बरोबर घेऊन महाराष्ट्र भर अंदोलने उभी केली जातील असा विनंतीवजा ईशारा ही देण्यात आला.
यावेळी पंढरपूर सोनार समाज संस्था अध्यक्ष मा.अरुणशेठ मंजरतकर, उपाध्यक्ष मा.संजयशेठ ढाळे, संस्था सहसचिव मा.काकासाहेब बुराडे, मा.राजेशभाऊ जोजारे, सोनार समाज अध्यक्ष मा.उमेशशेठ माळवे, माजी सोनार समाज अध्यक्ष मा.अनिलभाऊ डहाळे, मा.आनंदशेठ शहाणे, मा.प्रसादशेठ ढाळे, मा.गणेश मंजरतकर तसेच इतर समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
0 Comments