LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सण उत्सव साजरे करताना शांतता आणि सामाजिक सलोखा राखावाउपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांचे आवाहन

पंढरपूर (दि.24):- रामनवमी,रमजान ईद, हनुमान जयंती, महात्मा फुले जयंती, गुढीपाडवा आदी आगामी काळात येणार सण, उत्सव सर्वांनी शातंतेमध्ये साजरे करावेत. सर्वधर्मीय बांधवांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करीत हे, सण उत्सव साजरे करावेत. या काळात सामाजिक सलोखा, शांतता कायम राखून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांनी केले आहे.
       सण ,जयंती उत्सव व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस संकुल पंढरपूर येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रशिक्षणार्थी आयपीएस अंजना कृष्णन, तहसीलदार सचिन लंगुटे , पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके, तय्यब मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर तालुक्यातील पोलीस पाटील तसेच शहर व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.
   यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.भोसले म्हणले पंढरपूर तालुक्यात सर्व जाती-धर्मीय बांधव एकत्र येवून सण, उत्सव साजरे करतात, ही आजपर्यंतची परंपरा आहे. त्यामुळे आजपर्यंत तालुक्यात सामाजिक सलोखा आणि शांतता टिकून असून हीच परंपरा कायम राखणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आगामी काळात साजरे होणारे सण, जयंती उत्सव काळात सर्वांनी नियमांचे पालन करून आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करून उत्साही वातावरणात साजरे करावेत. सण ,जयंती उत्सवाच्या अनुषंगाने लावण्यात येणारे बॅनर हे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने लावण्यात यावेत.तसेच ते वेळेत काढून घ्यावेत. मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नये, तसेच आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
                यावेळी पोलीस निरिक्षक घोडके म्हणाले सर्व जाती धर्मातील समाज बांधवानी आप आपले सण उत्सव शांततेत व उत्साही वातावरणात साजरे करावेत. सोशल मीडियावरील पोस्टची खात्री केल्याशिवाय ती व्हायरल करू नये. सोशल मीडिया वापरतांना खबरदारी घ्यावी. समाज मन बिघडवणारी अनुचित पोस्ट व्हायरल करणे टाळावे.सोशल मीडियावरील बहुतांश आयडी चुकीच्या असल्याने अशा चुकीच्या आयडीला लाईक किंवा पोस्ट शेअर करू नये. कोणी आक्षेपार्ह पोस्ट ठेवली तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
           यावेळी पंढरपूर तालुक्यात शांतता अबाधित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना काय व कशा याविषयी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना बैठकीत समाधानकारक उत्तरे दिली.
000000000

Post a Comment

0 Comments