शक्ती अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात तळागाळापासून संसदेपर्यंत, राजकारणात परिवर्तनवादी बदल घडवून आणण्यासाठी जेंडर बजेट वर चर्चासत्र जवाहर भवन नवी दिल्ली येथे माजी मंत्री सलमान खुर्शीद, खासदार प्रणिती शिंदे, AICC सचिव दिव्या मदेरणा, प्रा. चेतना त्रिवेदी आदीच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केले होते.
या चर्चासत्रात महिलांचे सक्षमीकरण व राजकारणात महिलांसाठी हक्क आणि भागीदारी सुरक्षित करणे, रोजगार, आरोग्य, स्वच्छता नागरी सुविधा, शिक्षण व इतर महिला प्रश्नाची स्थिती सुधारण्यासाठी, महिलांच्या विकासासाठी बजेट मध्ये तरतूद केली की नाही तरतूद केलेल्या बजेट आणि योजनांचा त्यांना लाभ मिळतो की नाही मिळत नसल्यास त्याची कारणे, तसेच महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी, स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने आर्थिक धोरणे राबविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments