प्रतिनिधी-अरळी येथे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या अरळी बंधारा २२कोटी २२ लाख निधी व इतर विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरवेळी आमदार समाधान आवताडे यांनी गुढीपाडवा व हिंदू नववर्ष या शुभ मुहूर्तावर ग्रामदैवत नरसिंह प्रभुचे दर्शन घेऊन सर्वांच्या भल्यासाठी प्रार्थना केली.
रात्रीचा-दिवस करून निवडणुकीत अरळी गावातील अनेक सहकाऱ्यांसोबत जेष्ठांनी देखील मीच उमेदवार आहे असा प्रचार करून मतदारसंघातील कानाकोपऱ्यात पोहचले. तुम्ही सर्वांनी कष्ट घेऊन मला आमदार' म्हणून काम करण्याची संधी दिलीय याची जाणीव आणि जबाबदारी कायम ठेवून आपणा सर्वांच्या विकासासाठी व गावाच्या धोरणात्मक वैभवासाठी मी नेहमी बांधील राहून आपली सेवा करेन असे अभिवचन आमदार आवताडे यांनी यावेळी व्यक्त करून कृतज्ञता मांडली.
यावेळी माजी जि.प.सदस्य बापूराया उर्फ सिद्धू चौगुले, उपसभापती रमेश भांजे, संचालक अशोक केदार, जगन्नाथ कोकरे चनबसू येणपे, माजी सरपंच गणेश गावकरे, शिवयोगाप्पा पुजारी, रावसाहेब राजमाने, राजू पाटील, श्रीमंत मेहेत्रे, शैल्य गोडसे, गंगाधर काकणकी, पावले, विजय भोसले, तिपन्ना सिंदखेड, सतिश पाटील, संतोष गणेशकर, अशोक भिंगे, शिवाजी मोहिते, शिवशंकर भांजे, तात्या पवार, मल्लिकार्जुन भांजे तसेच अरळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पदाधिकारी व तरूण सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
0 Comments