LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चैत्र गुढीपाडव्या निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार



     पंढरपूर दि.30 :- साडेतीन मुहुर्तापैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, त्यानिमित्ताने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस दुपारच्या पोषाखावेळी अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
 श्री विठ्ठलास सोने पगडी, कौस्तुभ मणी, हि-याचा कंगन जोड, दंडपेट्या जोड मोठा, नाम निळाचा, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, लहान शिरपेच, नवरत्नाचा हार, तोडे जोड, तुळशीची माळ, मत्स्य जोड, पितांबर व ठुशी तसेच श्री रूक्मिणीमातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, लक्ष्मीहार, सरी व कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले.
 याशिवाय, श्री विठ्ठलास रेशमी सोहळे - अंगी व श्री रूक्मिणीमातेस नऊवारी रेशमी साडीचा पोषाख करण्यात आला आहे. त्यामुळे श्रींचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments