LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

निंबोणी मरीआई चौक ते सलगर बु.रस्त्याच्या दुरुस्तीला 10 कोटी मंजूर . आ.समाधान आवताडे यांची माहिती


प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी
मरीआई चौक ते सलगर बुद्रुक हा ९ किमी चा रस्ता अत्यंत खराब झाला होता त्या रस्त्यावरून दळणवळण जास्त होते मात्र खराब रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता ही बाब लक्षात घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पत्राद्वारे या रस्त्याला दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती,
त्या पत्राला अनुसरून केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी या रस्त्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाला जोडणारा हा प्रमुख रस्ता असून या रस्त्यावरून तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्व गावातून दळणवळण होत आहे त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त होणे गरजेचे होते त्यामुळे आमदार समाधान आवताडे यांनी तात्काळ या रस्त्यासाठी निधी देण्याची मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत मंगळवेढा खोमनाळ भाळवणी निंबोणी सलगर बुद्रुक प्रजिमा 73 अंतर्गत 20 ते 29 किमी मध्ये सुधारणा करणे मध्ये शासनाकडून दहा कोटी रुपये मंजूर झाला असून या कामाच्या निविदा काढून लवकरच काम सुरू करण्यात येईल असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. 
याकामसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांचे सहकार्य लाभले.

फोटो- समाधान आवताडे

कोट 
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्व रस्त्याच्या अवस्था दयनीय झालेली होती. महायुतीचे सरकार आल्यापासून आमदार समाधान दादा आवताडे यांच्या मुळे रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्यामुळे आता येत्या काळात मतदार संघातील सर्व रस्त्याची कामे दर्जेदार होतील असा विश्वास व्यक्त केला.
 श्रीशैल्य धायगुंडे सलगर बुद्रुक.

Post a Comment

0 Comments