पंढरपूर प्रतिनिधी दि.19- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानूसार 100 दिवसीय कार्यालयीन विशेष मोहिमे अंतर्गत कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास कार्यक्रम अंतर्गत् कार्यशाळेचे उदघाटन सतिश माने विभागीय कृषी विद्यावेता (आय.सी.एल.) पुणे, प्रा.ज्ञानसागर सुतार, संतोष करंजे कृषितज्ञ, कृषि विज्ञान केंद्र बारामती व कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे यांनी आपल्या प्रस्तावित भाषणात कारखान्साचे ऊस उत्पादक शेतकरी यांना कारखान्याचे वतीने ऊस बेणे, सुधारीत रोपे,जैविक व सुक्ष्म अन्नद्रवे, कंपोस्ट खते वाटप करण्यात येते. तसेच शेतकरी प्रशिक्षण येाजना, सभासदांकरीता अपघात विमा योजना इ. विविध योजना राबविल्या जातात. त्यांनी कारखाना चाचणी हंगाम 1998-1999 रोजी झाला पुर्वी 2500 टि.सी.डी.चा कारखाना 3500 टि.सी.डी.ने सुरु आहे. 30 केल.पी.डी. आसवणी प्रकल्प व 18 मे.को-जन कार्यरत आहेत. यावर्षी कारखाना पुर्ण क्षमतेने चालवू असे सांगीतले.
बारामती कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ संतोष करंजे यांनी (AI) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस पीक जोमाने पिकवता येते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवत येतो. तर साखर कारखान्याच्या साखर उताऱ्यात फरक पडतो त्यामुळे कुत्रिम बुध्दीमत्तेवर (AI) ऊस पीकांसाठी वापर करणे सध्या काळाची गरज असल्याचे सांगीतले.
प्रा. श्री.ज्ञानसागर सुतार यांनी ऊस पीक जोपासना व वाढ यावर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, जर ऊसाची उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर प्रथम माती परिक्षण करुन घेणे, पाण्याचा पी.एच.चेक करणे व त्याप्रमाणे खते वापर केल्यास 100 टक्के ऊस उत्पादक क्षमता वाढेल. त्याच बरोबर सतिष माने यांनी ऊस पीक, अन्न द्रव व्यवस्थापन व किड नियंत्रण यावर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी आधुनिक तंत्रज्ञान युगात प्रत्येकाने कुत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचे शेती विषयक ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना औषधे, खते, विद्राव्ये खते, पिकांवरील रोग व त्यावरील उपाय लगेच मोबाईल ॲपवर मिळू शकेल. यापुढे त्यांनी युवा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा वापर करावा तसेच कार्यक्षेत्रातील सभासदांनी (AI) तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर केल्यास कारखान्याचे वतीने त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल तसेच भागातील सभासदांनी ग्रुप केल्यास त्यांना कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे अभ्यास दौरा करण्यात येईल असे काळे यांनी सांगीतले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, संचालक सर्वश्री मोहन नागटिळक, युवराज दगडे, जयसिंह देशमुख, अमोल माने, अरुण नलवडे, शंकरमहाराज चव्हाण, भारत आंबुले, विक्रम बागल, ज्योतीराम पोरे, संतोष भोसले, कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, माजी संचालक, राजाराम माने, इब्रहिम मुजावर, मा.पंचायत समिती सदस्य सुरेश देठे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष अनिल नागटिळक, नारायण शिंदे, ऊस बागायतदार अर्जुन जाधव, महादेव सुर्यवंशी, कारखान्याचे खाते प्रमुख,कृषि ॲग्रीओव्हरशिअर, भागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठया संख्येनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.एस.पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रगतशिल बागायतदार सुरेश देठे यांनी मानले.
0 Comments