LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑👉 *खासदार प्रणिती शिंदे यांचा उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी व कोंडी गावभेट दौरा तसेच अकोलेकाटी येथील भूमिगत गटार करण्याच्या कामाचे भूमिपूजन*👉 *जल संधारण विभागाने अकोलेकाटी तलावाचे काम लवकर पूर्ण करावे : खा. प्रणिती शिंदे*


खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदासंघांतील उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी
🟥 अकोलेकाटी
🟦 कोंडी
या गावाला भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले.

यावेळी नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.

*तसेच अकोलेकाटी या गावात जिल्हा वार्षिक योजना सन २०२४ - २०२५ अंतर्गत खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून मौजे अकोलेकाटी तालुका उत्तर सोलापूर येथील भारत ढगे घर ते आबा लामकाने घरापर्यंत भूमिगत गटार करणे या कामासाठी ४,९९,४४७/- रुपये निधी मंजूर करण्यात आले. या निधीतून कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने होणाऱ्या कामाचे भूमिपूजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.*

यावेळी सोलापुर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव, सरपंच अंजली क्षीरसागर, सचिन गुंड, संजय पौळ, देविदास लामकाने, राजू क्षीरसागर, वैभव घोडके, कोंडी चे सरपंच सौ. निंबाळकर, सोमनाथ राऊत, प्रणिता शिंदे, विक्रांत काकडे, शिवाजी नीळ, बाबाराजे नीळ, गजेंद्र निंबाळकर, विजयसिंह जाधव, अमर भोसले, ब्रह्मदेव पवार, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments