LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

योग हा भारतीय संस्कृतीचा ठेवा -योग प्रशिक्षिका रेखा चंद्रराव



स्वेरीत दहावा 'मासिक योग दिन' साजरा
पंढरपूर- ‘पैसा-आडका, घर, जमीन ही आपली खरी संपत्ती नसून ‘आपले शरीर हीच आपली खरी संपत्ती’ आहे. त्यामुळे आपली ही संपत्ती जपण्यासाठी आणि शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमित योग साधनेची गरज आहे. योग केल्याने आपले शरीर लवचिक राहते. सर्व अवयव कार्यरत राहतात. मन प्रसन्न होते व रोजचा दिवस  सकारात्मक जातो. योग हा भारतीय संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे.’ असे प्रतिपादन योग प्रशिक्षिका व प्रसिद्ध निवेदिका रेखा चंद्रराव यांनी केले.
         प्रत्येक वर्षी दि.२१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थात जगभरात साजरा केला जातो. स्वेरीत देखील हा ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात आला. त्यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी यापुढेही ‘स्वेरी अंतर्गत असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या दि.२१ तारखेला सामुहिक ‘योग दिन’ साजरा करण्याचे घोषित केले होते. तेंव्हापासून प्रत्येक महिन्याच्या दि. २१ तारखेला न चुकता स्वेरीत ‘योग दिन’ घेतला जातो. सोमवार, दि. २१ एप्रिल २०२५ रोजी स्वेरीमध्ये ‘दहावा योग दिन’ साजरा करण्यात आला. स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी या दहाव्या ‘योग दिन’ मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. 'ओम' या गीताने ‘योगा डे’ ची सुरवात झाली. योग प्रशिक्षिका रेखा चंद्रराव व वेलनेस कोच कृतांजली सावंत यांनी स्वेरीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक यांच्याकडून विविध प्राणायम करवून घेतले. यामध्ये पद्मासन, वृक्षासन, ताडासन, पवन मुक्तासन, सूर्यनमस्कार, श्वास तसेच अवयवांचे विविध प्रकार करून घेतले. मार्गदर्शन करताना प्रशिक्षिका रेखा चंद्रराव पुढे म्हणाल्या की, ‘योग हा एक सखोल अभ्यास आहे ज्यामध्ये शारीरिक मुद्रा, ध्यान आणि नैतिक व मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट आहेत. प्राचीन भारतात रुजलेली ही योगसंस्कृती व्यक्तीला परमात्म्याशी जोडण्याचा आणि सर्वांगीण कल्याण करण्यास मदत करते. शारीरिक पैलू, विविध योगमुद्रांमुळे लवचिकता आणि शारीरिक सामर्थ्य सुधारते. नियमित व्यायाम केल्यास मन प्रसन्न राहते व मनाची एकाग्रता वाढते. मन, शरीर बुद्धी शुद्ध राहते. ध्यान धारणेमध्ये प्रचंड शक्ती असून यातून मोठ-मोठे आजार दूर होतात. योग सावकाश केल्याने त्याचे परिणाम समजतात.’ असे सांगून ‘योगा’ चे होणारे फायदे सांगितले. या योग सरावानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह जाणवत होता.सदरचा ‘दहावा योग दिन’ हा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, इंजिनिअरींग, फार्मसीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत पार पडला. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या डॉ. एन.पी. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर  यांनी आभार मानले.

*चौकट – स्वेरीत नियमित प्राणायम-*
स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही मुख्य महाविद्यालयात व त्या अंतर्गत असलेल्या पदव्युत्तर व पदवी विभागात मागील अनेक वर्षांपासून नियमित प्राणायम केला जातो. सकाळी १० ते १०.३० दरम्यान स्वेरी कॅम्पसमध्ये सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात योगा करत असल्याचे दिसून येते. योगाचे महत्व पटल्यामुळे वेळापत्रकातच ‘प्राणायम’चा समावेश केला गेला आहे. त्यामुळे दिवसभर विद्यार्थी फ्रेश असतात.

Post a Comment

0 Comments