पंढरपूर पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या मातोश्री मथुराबाई आप्पा प्रक्षाळे यांचे आज दुपारी तीन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास आकस्मित निधन झाले आहे. मृत्यू समय त्यांचे वय 83 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले 4 मुली जावई सून नातवंडे असा मोठा परिवार आहे.
भटुंबरे येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव नेण्यात आले असून आज सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी त्यांच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
0 Comments