सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, आणि भाळवणी गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरच सोडविणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मंगळवेढा तालुक्यात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर असून तो प्रश्न शासनदरबारी मांडला आहे त्याचप्रमाणे सामाजिक संस्थेच्या सहकार्याने काम ही सुरू केले आहे. या पाच वर्षात मंगळवेढा तालुक्याचा पाण्याच्या प्रश्न संपविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे काही गावांमध्ये गायरान जमिनीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे घरकुलांना अडचण येते तोही प्रश्न जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून शासन स्तरावर पाठपुरावा करून गावकऱ्यांना घरकुलासाठी जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी मंगळवेढा काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, युवक अध्यक्ष रविकिरण कोळेकर, शहराध्यक्ष राहुल घुले, खोमनाळचे सरपंच सौ मदने, उपसरपंच डॉक्टर देशमुख, राजाभाऊ इंगवले, कांबळे काका, भाळवणीचे सरपंच श्री लक्ष्मण गायकवाड, नामदेव चौगुले, हुकूम मुलानी, नाताजी आयवळे, इसाक शेख, फिरोज मुलानी, अवघडे ताई व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments